Tuesday, April 15, 2008

पुनः हरी ॐ

पुनः हरी ॐ । हे शब्द अगदी कठीण आहेत ते त्याच्या उच्चारा मुळे नव्हे तर ते कधी वापरावे लागतात त्या प्रसंगा मुळे ।
हरी ॐ म्हणजे काय तर सुरुवात अगदी पहिल्या पासून । एख़ाद्या गोष्टीची सुरुवात केल्या वर जर ' इति ' पर्यंत निर्विघ्न झाली तर किती आनंद होतो नाही ?
पुनः हरी ॐ म्हणजे त्या दुःखाचं सांत्वन एका आशे बरोबर की आता पुन्हा पहिल्या पासून सुरु केल्या वर तरी चुका होणार नाहीत। मुळात माणूस जर सुज्ञ असेल तर तो मागच्या वेळेचा अनुभव बरोबर ठेवातोच.
असं जरी असेल तरी हा ' पुनः हरी ॐ ' कोणाच्याही जीवनात येऊ नए हीच ईश्वर चरणी प्रार्थना ।
आणि ' हरी ॐ ' पासून ते ' ति ' पर्यंतचा प्रवास सुखाचा होवो या शुभेच्या .

1 comment:

Anonymous said...

It is similar to it.